थोडक्यात महत्त्वाचे

चेंबूर येथे  ७ बांगलादेशींना अटक

मुंबई – चेंबूर येथे माहुल गावात ७ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. यात २ पुरुष आणि ४ महिला होत्या. ते भारतीय असल्याची कोणतीही कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. गेल्या ५ वर्र्षांपासून ते येथे रहात होते. यापूर्वी भिवंडी येथे रहाणार्‍या २ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे, तर नाशिक येथील बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी धाड घालून ८ बांगलादेशींना कह्यात घेण्यात आले आहे. (बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! – संपादक)


पुणे वाहतूक पोलिसावर आक्रमण

पुणे – येथे एका वाहतूक पोलिसाने भ्रमणभाषवर बोलत गाडी चालवत असल्याने एकाला हटकले होते. नंतर त्याने त्या वाहतूक पोलिसावर आक्रमण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यात ते घायाळ झाले. (पोलिसांना मारहाण होणे लज्जास्पद ! – संपादक)


अमली पदार्थ बाळगणार्‍यांची धिंड

कोल्हापूर – येथे २ किलो गांजा पकडण्यात आला. संबंधित आरोपींची धिंड शहरातून काढण्यात आली. यापूर्वीही अनेक वेळा कोल्हापूर येथून गांजा विक्रेत्यांना पकडण्यात आले आहे.


अंधेरीत जी.बी.एस्.चा रुग्ण

मुंबई – अंधेरी येथे ‘जी.बी.एस्.’ या आजाराचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही याचा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत.


प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र

नाशिक – देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात विवाहापूर्वीचे समुपदेशन केंद्र ‘प्री मॅरिटल कौन्सिलिंग सेंटर’ चालू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत हे घोषित केले. नाशिक जिल्ह्यातून या केंद्राचा शुभारंभ होणार आहे.


सलमान खान आक्रमणप्रकरणी  जामीन संमत

मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्यावरील आक्रमणप्रकरणी वासीम चिकना आणि संदीप बिश्नोई यांना जामीन संमत झाला आहे. ‘व्हॉट्सॲप’ गटात त्यांच्यावरील आक्रमणाचा कट रचल्याचे म्हटले गेले होते; परंतु पोलिसांना प्रत्यक्षात पुरावे मिळालेले नाहीत.


गडचिरोली ‘इकोसिस्टम’चे केंद्र बनणार ! – मुख्यमंत्री

नागपूर – विदर्भात देशातील सर्वांत मोठी ‘इकोसिस्टम’ गडचिरोली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. विदर्भाच्या ‘मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो बिझनेस कॉन्क्लेव्ह’ आणि ‘इन्व्हेस्टमेंट समिट’ यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.