अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे पुणे येथील ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थे’तील विश्वस्त पदाचे त्यागपत्र !

भांडारकर प्राच्‍यविद्या संशोधन संस्था

पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी आगर्‍याहून सुटका करतांना ‘लाच’ दिली’, असे विधान चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले होते. सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर ‘लाच’ शब्द वापरायला नको होता’, असे म्हणत त्यांनी ‘दिलगिरी’ व्यक्त केली आणि ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थे’तील विश्वस्त पदाचे त्यागपत्र दिले, असे संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन यांनी घोषित केले. ‘सोलापूरकर यांनी ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थे’तील विश्वस्त पदाचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी शिवभक्तांनी केली होती.