‘८.३.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ क्रमांक २ वर कु. प्रार्थना महेश पाठक (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिच्या वाढदिवसानिमित्त एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यातील तिचे छायाचित्र पाहिल्यानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कु. प्रार्थना हिचे छायाचित्र जिवंत झाल्यासारखे वाटत होते.
२. ‘तिच्या छायाचित्रातील डोळे आपल्याकडे बघत आहेत’, असे मला जाणवत होते.
३. तिच्या ओठांकडे पाहिल्यानंतर यापूर्वी तिचा ऐकलेला मंजूळ आवाज सूक्ष्मातून माझ्या कानी पडत होता.
४. दैनिक वाचन करत असतांना ‘ती मान वळवून आपल्याकडे बघत आहे’, असे मला वाटत होते.
५. ‘तिच्या कपाळावर आलेले केस मंद वार्याने झुलत आहेत’, असे मला जाणवले.
६. ‘प्रार्थना छायाचित्रातून प्रत्यक्षात बाहेर आली आहे’, असे मला जाणवत होते.’
– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.३.२०२३)
. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |