‘लव्ह जिहाद’विषयी स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी प्रविष्ट कराव्यात !
पुणे – शहर तसेच जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून अनेक हिंदु मुली-स्त्रिया या भावनिक फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत, असा दावा करत या स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी प्रविष्ट कराव्यात, असे आवाहन भाजपच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
सिंहगड रस्ता परिसरातील एका ३२ वर्षीय महिलेला मारहाण करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना नागपुरे यांनी उघडकीस आणली. या महिलेला पतीच्या निधनानंतर मिळालेला भविष्यनिर्वाह निधी, तसेच सोन्याचे दागिने अशी एकूण ३२ लाखांहून अधिक रक्कम एका पुरुषाने आणि त्याच्या कुटुंबियांनी हडपली. महिलेचा विश्वास संपादन करून ‘लव्ह जिहाद’चे जाळे या आरोपीने टाकले, असे नागपुरे यांनी सांगितले. भाजपचे पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे हेही या वेळी उपस्थित होते.