मारुति मंदिर, म्हापसा येथे आज ‘गोवा हिंदू युवा शक्ती’च्या वतीने सामुदायिक श्री हनुमान चालीसा पठण

म्हापसा – समाजातील तणाव आणि समाजजीवन भयमुक्त होऊन प्रत्येकात आत्मविश्‍वास, एकाग्रता वाढावी; नकारात्मक शक्ती दूर व्हावी आणि आध्यात्मिक प्रगतीद्वारे नामपठणामुळे प्रत्येकाला मनःशांती प्राप्त व्हावी, या धार्मिक उद्देशाने ‘गोवा हिंदू युवा शक्ती’ने मारुति मंदिर, म्हापसा येथे ८ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता सामुदायिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे.

हनुमान हे अकरावे रुद्र असून ते सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. हनुमान बल, बुद्धी, विनम्रता, निष्ठा आणि श्रीराम भक्ती यांचे ज्वलंत प्रतीक आहे. आजच्या पिढीला जीवनात या गुणांची नितांत आवश्यकता आहे. भक्ती म्हणजेच मानव आणि
परमेश्‍वर यांच्यामधील प्रेम व्यक्त करणारी एक सर्वांत प्रत्यक्ष आणि प्रभावी, अशी धार्मिक शक्ती आहे. ज्ञान, कर्म, उपासना आणि श्रद्धा यांचे एकत्रीकरण करून या धार्मिक शक्तीचा चौफेर प्रसार व्हावा, यासाठी सामुदायिक श्री हनुमान
चालीसा पठण महत्त्वाचे आहे.

‘गोवा हिंदू युवा शक्ती’च्या वतीने हनुमानाला करण्यात आलेली प्रार्थना !

महापराक्रमी मारुतिरायाने अक्ष, निकुंभ, माली, जंबु, घूम्राक्ष इत्यादी बलाढ्य असुरांचा वध करून त्रेतायुगात प्रभु श्रीरामाच्या चरणी क्षत्रीय धर्मसेवा वाहिली. द्वापरयुगात महाभारतात कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाच्या रथावर प्रस्थापित राहीला. कलियुगात श्रीविष्णूच्या कल्की अवतारात सुद्धा कलीचा नायनाट करण्यासाठी भगवान श्रीविष्णूला साथ देत तू असुरांविरुद्ध ठामपणे लढणार आहेस आणि ४ युगांचा शेवट होणार आहे. असा तू अजरामर चिरंजीव रुद्र अवतारी ! आमची श्रद्धा, विश्‍वास, निष्ठा आणि भक्ती अनेक वेळा डगमगते, तेव्हा हे रामदूता तू प्रभु श्रीरामाच्या चरणी अर्पिलेली निष्ठा आमच्यात निर्माण कर. सनातन वैदिक हिंदु धर्मासाठी देह चंदनाप्रमाणे झिजवण्यास आत्मबळ दे. तुझ्या प्रभूचे रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी समाजातील आसुरी प्रवृत्तीविरुद्ध विधायकरित्या लढण्यास सामर्थ्य दे. जसा तू सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून इंद्रियजीत आहेस, त्याप्रमाणे आम्हासही त्रिगुणांच्या आहारी न जाता केवळ सत्त्वगुणाने भारित होऊन, षड्र्िपूंना नियंत्रण ठेवण्यात आत्मशक्ती दे. अहंकार, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, सत्ता, पैसा आम्हास तुझ्यापुढे गौण आहे आणि आत्मिक सुख चिरंतर हृदयात राहो. आम्ही जे अजाण आहोत, त्या आम्हा सर्वांना तू सद्बुद्धी दे. कलियुगात प्रपंच सांभाळता केवळ नामस्मरण हाच साधा, सरळ मोक्षाचा मार्ग आहे, हे आम्हास उमजू दे. सामुदायिक
शक्तीचे महत्त्व कळू दे. ‘एक रहेंगे तो नेक रहेंगे ! बटेंगे तो कटेंगे !’(संघटित राहिलो, तर व्यवस्थित राहू ! विभागलो, तर कापले जाऊ !’), हा योगेश्‍वर महाराजांचा (उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) महामंत्र अखंड ध्यानात राहू दे ! एव्हढीच कृपा हे हनुमंता आम्हावर कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

‘गोवा हिंदू युवा शक्ती’च्या वतीने आयोजित सामुदायिक हनुमान चालीसा नामघोष आसमंतात निनादो !

‘गोवा हिंदू युवा शक्ती’ – हिंदूंसाठी एक प्रेरणा !

‘गोवा हिंदू युवा शक्ती’ ही गोव्यातील एक संघटना आहे, जी समाजातील विविध समस्यांवर प्रभावी कार्य करत आहे. हिंदु समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हितासाठी ही संघटना सक्रीय आहे.

१. धर्मांधांकडून फुले न घेण्याविषयी प्रबोधन !

ताज्या उदाहरणांमध्ये, गोव्यातील म्हापसा, शिवोली, पर्वरी, कळंगुट, पणजी आणि इतर शहरांमध्ये विजयादशमीच्या काळात हिंदु समाजाने झेंडूची फुले परराज्यांतील धर्मांधांकडून न घेण्याविषयी प्रबोधन केले. या मोहिमेद्वारे १ कोटी १२
लाख ५० सहस्र रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार रोखला. ही कृती धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोनांतून अत्यंत महत्त्वाची होती.

२. हिंदूंनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी एकत्र येण्यासाठी प्रयत्न !

‘गोवा हिंदू युवा शक्ती’ने गोमतंकातील युवकांना राष्ट्र आणि धर्म कार्यात जोडण्यासाठी आणि गावागावांत धर्मजागृती करण्यासाठी म्हापसा, कळंगुट, मडगाव, कोरगाव, अशा अनेक शहरांमध्ये बैठका घेतल्या. महाराष्ट्रात काही मासांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डा’च्या प्रमुखाने ‘आमच्या निशाणावर केवळ महाराष्ट्र सरकारच नहे, तर देहली सरकारही आहे’, अशी उघड धमकी दिली होती. अशी स्थिती असतांना हिंदूंनी राजकारणाकडे दुर्लक्ष न करता त्यांची सामाजिक आणि धार्मिक एकता कायम राखली पाहिजे, हे लक्षात घेऊन हिंदू युवा शक्तीनेही त्याची नोंद घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, ‘‘राजकारणाला धर्म असावा आणि धर्माला राजकीय दृष्टीकोन असावा.’’ आजच्या परिस्थितीत हे विचार पुष्कळ महत्त्वाचे आहेत. चीनच्या सीमारेषेवर संकट असतांना आणि जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतांना हिंदूंनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.

३. गोरक्षण !

गोव्यात मोकाट गायींना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर अपघातात गायींना दुखापत होणे, तसेच त्या मारल्या जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदू युवा शक्तीने मोकाट फिरणार्‍या गायींना ‘रेडियम पट्टा’ (रेडियम पट्टा रात्री वाहनांच्या दिव्यात चकाकतो आणि रस्त्यावरील गुरे दिसतात.) बांधण्याची मोहीम हाती घेतली.

४. देवस्थानांचे पावित्र्यरक्षण !

हिंदू युवा शक्तीने देवस्थानांचे पावित्र्यरक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या जत्रोत्सवात इतर धर्मियांना गाळे (छोटी दुकाने) लावण्यास अनुमती न देण्याची त्यांनी मागणी केली. यामुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जात असून समाजात एकता आणि सौहार्द राखले जात आहे.

५. युवकांना राष्ट्रहितासाठी सशक्त भूमिका घेण्यासाठी प्रेरणा देणारे संघटन !

अशा प्रकारे ‘हिंदू युवा शक्ती’ ही एक संघटना नाही, तर ती एक सामाजिक आणि धार्मिक आंदोलन आहे. ती राष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रवाह जपण्यासाठी झपाट्याने कार्यरत आहे. स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा
घेऊन ‘हिंदू युवा शक्ती’ समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि प्रत्येक युवकाला राष्ट्रहितासाठी सशक्त भूमिका घेण्यासाठी प्रेरणा देत आहे. युवकांना रोजगार, शिक्षण आणि समाजसेवा यांच्या दिशेने मार्गदर्शन करणारे, हे संघटन त्याच्या कार्यामध्ये सुसंगतता आणि एकात्मता आणते. ‘भारत महान’ ही धारणा त्यांना नवा उत्साह आणि प्रेरणा देते. या प्रेरणादायी कार्यामुळे ‘हिंदू युवा शक्ती’ आजच्या काळातील एक प्रमुख सामाजिक आणि धार्मिक आवाज बनली आहे.

– श्री. गोविंद चोडणकर, उत्तर गोवा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, अस्नोडा, गोवा.