
सत् चित् आनंद स्वरूप रामप्रभूंच्या प्राप्तीविना स्वातंत्र्याची कल्पनाच मूर्खपणाची आहे. जोवर स्थूल, सूक्ष्म, कारणदेहाचा संपर्क आहे तोवर स्वातंत्र्य असंभव ! जसा पिंजर्यातील पोपट ‘मी स्वतंत्र आहे’, असे गीत गातो, तसा कुणी नास्तिक भलेही माता, पिता, गुरुजन, वेदशास्त्रे यांचा धिक्कार करून स्वतःला स्वतंत्र मानतो; परंतु तो जन्म, मृत्यू, आजारपण, व्याधी, दारिद्रय, आपत्ती अथवा मृत्यू यांवर मात करू शकत नाही. त्याकरताच काही स्वातंत्र्याचा त्याग करून रामप्रभूंच्या आधीन व्हावे लागते. रामप्रभूंच्या कृपेने, कर्म उपासनेने आणि ज्ञानाने मल, विक्षेप, आवरण नष्ट होतात, स्वरूप प्राप्ती होते अन् मानव पूर्ण स्वतंत्र होतो. रामप्रभु सर्वांतर्यामी आहेत. त्या रामप्रभूंकडे पाठ फिरवून कुणाला सुख, आनंद आणि स्वातंत्र्य प्राप्त होईल ?
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२४)