रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर ३ दिवस कोणताही त्रास न होता सतत भावस्थितीत रहाता येणे आणि एका संतांची भेट होणार असे समजल्यावर त्रास चालू होणे; पण संतांच्या सत्संगात कोणताही त्रास न होणे

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे; पण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर ३ दिवस मला काहीही त्रास झाला नाही. मला सतत भावस्थितीत रहाता आले. तिसर्‍या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता एका संतांची भेट होणार असल्याचे मला कळले. सायंकाळी ६.३० पासून माझ्या पोटात दुखू लागले. मला मूळव्याधीचा त्रास चालू झाला. मला भीती वाटू लागली. जेवतांना घशातून घास खाली उतरत नव्हता. अनिष्ट शक्ती माझा घसा दाबत होती. तशाच स्थितीत मी ध्यानमंदिरात जाऊन देव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ आळवले अन् प्रार्थना केल्या. त्यानंतर संत खोलीत येताक्षणीच मला पुष्कळ प्रकाश जाणवला आणि गुरुकृपेने सत्संग संपेपर्यंत मला कोणताही त्रास झाला नाही.’

– सौ. श्रीदेवी पाटील, कुमठा नाका, सोलापूर.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक