‘ध्यानमंदिरात नामजप करतांना नामात मनाचा सहभाग अल्प होता. त्यामुळे मला आनंद घेता येत नव्हता. त्या वेळी मला श्रीकृष्णरूपात गुरुदेव दिसले. तेव्हा माझ्याकडून याचकभावे पुढील प्रार्थना झाली.

शरणागतभावे करते याचना ।
पहाशील का मजकडे हे मधुराणा ।। १ ।।
तुजकडे घे ना या मना ।
सवंगडी तुझा करवून घे रे कान्हा ।। २ ।।

इथे तिथे नुसतेच पळते ।
केवळ तुझा मधुर मुरलीनाद ऐकते ।। ३ ।।
पाऊल मनाचे तेथेच थबकते ।
मग आहे तिथून परतीच्या प्रवासाला निघते ।। ४ ।।
तुज सभोवती रुंजी घालते ।
तुझ्या कोमल चरणी क्षणभर विसावते ।। ५ ।।
उत्साह, आनंद भरभरून घेते ।
तुज पासूनी दूर जाण्याचा विचार सोडते ।। ६ ।।
ऐसीच प्रीती तुझी अखंड राहो ।
हे मधुरधिपती महाबाहो ।। ७ ।।
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२८.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |