परंपरागत विचारांचा केवळ नवीनाच्या मोहाने आधार सोडणे हे अनिष्ट !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आज आपल्या जुन्या शास्त्रशुद्ध परंपरा तुटल्या आहेत. जुन्यांच्या हटवादीपणाने आणि नवीनांच्या प्रज्ञाहतबुद्धीने हिंदु विचारसरणीची पूर्ण उपेक्षा झालेली आहे. त्यामुळे नवसुशिक्षितांना प्रभावीपणे मांडलेले असे काही नवीन विचार आकर्षक वाटतात. ‘स्वत:च्या आवडीनिवडी आणि सैल वागणे, याला बाधा न येता अध्यात्मही साधत असेल तर उत्तमच’, या विचाराने माणसे बहुसंख्येने एकत्र येतात आणि प्रच्छन्न, वामाचारी पंथ बळावतो. यासाठी ‘श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य गुरूंच्या आदेशासह वेदशास्त्राचाही आदेश प्रमाण मानला पाहिजे’, असे वरचेवर आवर्जून उल्लेखतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचा बोलू वेद नीति । करु संती केलें तें’, असेच स्वत:च्या आचार-विचारांचे तात्पर्य प्रतिपादित असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजही ‘हित साधून देणारी माऊली’ या शब्दांत वेदांचा गौरव करतात. तेव्हा परंपरागत विचारांचा केवळ नवीनाच्या मोहाने आधार सोडणे हे अनिष्ट आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती