
कोपनहेगन (स्विडन) – स्विडनमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञाताकडून सलवान मोमिका यांची त्यांच्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांनी वारंवार कुराण जाळल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मोमिका यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी राजकीय नेते रास्मस पालुदान (वय ३८ वर्षे) यांनी येथील तुर्कीयेच्या दूतावासासमोर कुराण जाळले. या वेळी पालुदान यांनी सलवान मोमिका यांच्या समर्थनार्थ भाषण दिले. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. पालुदान यांनी यापूर्वीही अनेकदा कुराण जाळले आहे. काही प्रकरणांमध्ये त्यांना शिक्षाही झाली आहे. पालुदान यांना मुसलमानांकडून सतत धमक्या मिळत आहेत.
पालुदान म्हणाले की, मी कोपनहेगनमधील तुर्कीयेच्या दूतावासासमोर कुराण घेऊन उभा आहे. तुम्ही बघू शकता. इथे कुराण आधीच जळत आहे. हे सलवान मोमिका यांच्या बलीदानाच्या आणि इस्लामवरील त्यांच्या टीकेच्या स्मरणार्थ आहे. मला हे मोठे पुस्तक जाळल्याने पुष्कळ आनंद झाला. आपल्या देशामध्ये मुसलमान कधीही शांततेत राहू शकणार नाहीत. यासाठीच एकतर ते जिथून आले होते तिथे त्यांनी परत जावे. अन्यथा आपल्याला त्रास सहन करावा लागेल आणि आपला धर्म सोडावा लागेल. ते आपल्याला त्यांच्या शब्दांनी नाही, तर हिंसाचाराने धर्मांतरित करतील.