‘फास्ट टॅग’ स्कॅनिंग ठप्प

नागपूर – मुंबई-समृद्धी महामार्गावरील ४ पथकर नाक्यांवरील सुमारे २०० कर्मचारी मागील ४ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे तेथील ‘फास्ट टॅग’च्या स्कॅनिंगचे काम थांबले. ‘फास्ट टॅग’च्या माध्यमातून वाहनधारकांच्या बँक खात्यातून पथकराची रक्कम वजा होते. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे. त्यासाठी वाहनावरील ‘फास्ट टॅग स्टिकर’ स्कॅन करावे लागते. त्यासाठी पथकर नाक्यावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने ‘फास्ट टॅग’ स्कॅनिंग न करताच वाहने जात आहेत.
‘अधिकचा पथकर घेतला जात आहे’, अशी तक्रार वाहनधारकांची आहे. वेतनवाढ आणि सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा नियम लागू करावेत, अशी मागणी संपावर गेलेल्या कर्मचार्यांनी केलेली आहे.