इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. अभिषेक पै अन् इतरांशी जवळीक साधणार्‍या आणि संतांप्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय !

चि. अभिषेक पै यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. अभिषेक पै

१. ‘अभिषेकला वाचनाची अतिशय आवड आहे.

२. सेवेसंबंधित विषयांचा अभ्यास चांगला असणे 

त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्याची अभ्यासू वृत्ती आहे. तो मराठी किंवा हिंदी भाषेतील लिखाणाचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करतो. त्या वेळी तो केवळ भाषांतर करत नाही, तर लिखाणाची विश्वासार्हताही तपासतो आणि त्यात सुधारणाही चांगल्या प्रकारे करतो. त्याला भाषांतर करायला किंवा लिखाण पडताळायला दिल्यास ‘अभिषेकने केलेली सेवा अचूकच असणार’, याची साधकांना शाश्वती असते.

३. चांगली कल्पकता 

त्याला कलेसंदर्भात विविध संकल्पना चांगल्या पद्धतीने सुचतात. त्याला काही कलाकृती बनवून दाखवल्यास तो त्यातील सुधारणाही बारकाईने सांगतो. ‘त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असूनही मराठी भाषेतील कलाकृतींमधील बारकावे त्याच्या चांगल्या प्रकारे लक्षात येतात’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

४. प्रांजळ 

तो व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे देतो. त्या वेळी तो मनातील सर्व विचार मोकळेपणाने सांगतो.

५. त्याची सर्व साधकांशी जवळीक आहे. 

६. इतरांना साहाय्य करणे 

आम्हाला एखादी सेवा करतांना अडचण आल्यास आमच्या मनात प्रथम ‘अभिषेकला विचारूया’, असा विचार येतो. त्याचा सेवेशी संबंधित विषयांचा अभ्यास चांगला आहे. त्याच्याशी बोलल्यावर अडचणींवर उपाययोजना काढणे सोपे होते. तो आम्हाला तत्परतेने साहाय्य करतो.

७. सेवेची तळमळ 

अभिषेकचा विवाह ४.२.२०२५ या दिवशी असूनही ३०.१.२०२५ या दिवसापर्यंत तो सेवा करत होता.

८. चुकांविषयी संवेदनशील 

त्याच्याकडून एखादी चूक झाल्यास तो लगेच क्षमा मागतो. त्याच्याकडून त्याच्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीच्या संदर्भात चूक झाल्यास तो त्या व्यक्तीचीही क्षमा मागतो.’

– सेवेशी संबंधित साधक

चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय

१. शांत आणि नम्र 

‘सिद्धि पुष्कळ शांत आणि स्थिर आहे. ती नम्रतेने बोलते.

२. तिचे रहाणीमान पुष्कळ साधे आहे.

३. तिचे हास्य निरागस आहे. तिचे मन निर्मळ आहे. 

४. सात्त्विक वृत्ती

तिची कपडे आणि अलंकार यांची निवड, तसेच अन्य वस्तूंची निवड पुष्कळ सात्त्विक असते. तिच्याकडे पाहूनच सात्त्विकता जाणवते.

५. शिकण्याची वृत्ती 

तिला विविध सेवा शिकण्याची तळमळ आहे. एखादी सेवा लवकर होण्यासाठी काही सूत्रे तिच्या लक्षात आल्यास ती लगेच इतरांनाही त्याविषयी सांगते.

६. अंतर्मुख 

ती मितभाषी आहे. ‘ती देवाशी अंतर्मनातून सतत बोलत असते’, असे तिच्याकडे पाहिल्यावर जाणवते.

७. जवळीक साधणे 

तिच्यात ‘इतरांचा विचार करणे आणि त्यांना प्रेमाने समजून घेणे’ हे गुण असल्याने ती सहजतेने इतरांशी जवळीक साधते. ती सेवेशी संबंधित कुणी साधक रुग्णाईत असल्यास ‘त्यांना महाप्रसाद किंवा औषध दिले आहे ना ?’, या संदर्भात लगेच विचारपूस करते.

८. सेवेप्रती भाव 

तिचा ‘प्रत्येक सेवा चांगली कशी करता येईल’, असा विचार असतो. ‘ती करत असलेली सेवा नंतर अन्य साधकांना करावी लागल्यास ते ती सेवा सहजतेने कसे करू शकतील ?’, यासाठी ती उपाययोजना काढते. ती ‘तिच्या सेवांमध्ये सूक्ष्मातील स्पंदने कशी जाणवतात ?’, असे प्रयोग करून सहसाधिकांना त्याविषयी विचारून घेते.

ती गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात राहून सेवा करते. ती सेवा करतांना प्रार्थना करत असतांना तिची भावजागृती होते.

९. संतांप्रती भाव 

‘तिच्या मनात संतांप्रती पुष्कळ भाव आहे’, असे जाणवते.’

– सेवेशी संबंधित साधक

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३१.१.२०२५)

उखाणे

श्रीकृष्णाच्या कृपेने लाभले परात्पर मोक्षगुरु ।
… आणि मी समवेत मनापासून साधना करू ।।

अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।
… च्या जोडीने करतो कुलदेवतेची आरती ।।