सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे प्रकाशरूपात साक्षात् दर्शन घेणारे कांचीपूरम् येथील भाग्यवान सुतार श्री. मुरुगन् !

१. श्री. बालाजीअण्णांनी स्वतःच्या वास्तूला ‘गुरुनिवास’ असे नाव देणे आणि ‘ही वास्तू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची, म्हणजेच गुरूंची आहे’, असा त्यांचा भाव असणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कांचीपूरम् येथील साधक श्री. बालाजीअण्णा यांनी त्यांच्या वास्तूचा वरचा मजला साधकांना रहाण्यासाठी दिला आहे. हा त्यांचा मोठाच त्याग आहे. तमिळनाडूमध्ये साधकांना रहाण्यासाठी मिळालेली ही पहिलीच वास्तू म्हणता येईल ! या वास्तूला श्री. बालाजीअण्णा यांनी ‘गुरुनिवास’ असे नाव दिले आहे. ‘ही सर्व वास्तू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची, म्हणजेच गुरूंची आहे’, असा त्यांचा भाव आहे.

२. वास्तूला ‘गुरुनिवास’ हे नाव दिल्यावर तेथे सुतारकाम करणार्‍या श्री. मुरुगन् यांना स्वप्नात प.पू. डॉक्टरांचे झालेले दिव्य दर्शन !

श्री. बालाजीअण्णा यांनी त्यांच्या वास्तूला दिलेले नाव

ज्या वेळी बालाजीअण्णांनी वास्तूला ‘गुरुनिवास’ हे नाव दिले, त्याच्या दुसर्‍या दिवशी तेथे सुतारकाम करणार्‍या श्री. मुरुगन् वीरय्या नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एक दिव्य पुरुषाचे दर्शन झाल्याचे त्यांनी श्री. बालाजीअण्णांना सांगितले. एका प्रकाशझोतातून हा दिव्य पुरुष आल्याचे त्यांनी पाहिले. त्या दिव्य पुरुषाने सोवळे, शेला आणि डोक्याला फेटा किंवा काहीतरी वस्त्र गुंडाळले होते; पण हे वस्त्र रेशमी होते. त्याने कंबरेच्या वस्त्रातून विभूती काढली आणि श्री. बालाजीअण्णांच्या वास्तूच्या प्रवेशद्वारावर २ मुठी करून ती फेकली. त्यानंतर हा दिव्य पुरुष वरच्या माळ्यावर आला. ज्या खोलीत मी रहाणार आहे, त्या खोलीत फिरून त्याने तेथेही विभूती फेकली. नंतर तो श्री. मुरुगन् यांच्यासमोर उभा राहिला. श्री. मुरुगन् सांगत होते, ‘‘त्या पुरुषाचे तेज पाहून माझे डोळे दिपले. त्याने माझ्यावरही (मुरुगन् यांच्यावरही) विभूती फेकली आणि तो प्रकाशात अदृश्य झाला.’’ एवढे बोलून मुरुगन थांबले. त्याच वेळी श्री. बालाजीअण्णांनी त्यांना प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, माझ्या स्वप्नात हेच आले होते.’’

३. वास्तूला ‘गुरुनिवास’ या नावाची पाटी लावताक्षणीच तेथे गुरूंची ऊर्जा कार्यरत होणे आणि त्याची प्रचीती श्री. मुरुगन् या अनोळखी सुतारांनाही येणे 

श्री. मुरुगन्

यातून लक्षात आले की, ‘श्री. बालाजीअण्णांनी ही वास्तू गुरूंना अर्पण केली आहे, तर साक्षात् गुरुच त्या वास्तूचे रक्षण करत आहेत.’ ‘गुरुनिवास’ या नावाची पाटी वास्तूला लावताक्षणीच तेथे गुरूंची ऊर्जा कार्यरत झाली आणि त्याची प्रचीती त्या अनोळखी सुतारालाही आली. ‘गुरुदेवांचे प्रकाशरूपात साक्षात् दर्शन घेणारा सुतार किती भाग्यवान आहे’, असे मला वाटले. त्याला दर्शन देऊन पुढील कामासाठी त्याला शक्ती आणि चैतन्य पुरवणारे धन्य ते गुरुदेव !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरूवण्णमलई, तमिळनाडू. (१३.१२.२०२४)


एका नागाने फणा काढून ‘गुरुनिवास’ वास्तूला वरपासून खालीपर्यंत पहाणे, नंतर त्याने भूमीवर फणा टेकवून वास्तूला नमस्कार करून निघून जाणे आणि २ वर्षांपूर्वी काम चालू झाल्यावरही कामगारांना नागाचे दर्शन झालेले असणे

‘श्री. मुरुगन् हे सुतार श्री. विनायक शानभाग यांच्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘साधारणतः एक मासापूर्वी मी या वास्तूसमोर एक नाग प्रत्यक्ष उभा असलेला पाहिला. मी त्याला मार्गिकेमधून पहात होतो. या नागाने फणा काढून प्रथम ‘गुरुनिवास’ या वास्तूला वरपासून खालीपर्यंत पाहिले आणि नंतर त्याने भूमीवर फणा टेकवून वास्तूला नमस्कार केला आणि तो निघून गेला.

या आधी ज्या वेळी २ वर्षांपूर्वी या वास्तूचे काम चालू झाले, त्या वेळीही येथे काम करणार्‍या कामगारांना नागाचे दर्शन झाले होते. यातून असे लक्षात येते, ‘जेथे गुरुदेवांच्या ऊर्जेने सात्त्विक वास्तू उभी रहाते, तेथे दैवी तपस्वी जीवही पशू-पक्षी आणि प्राणी यांच्या रूपात वावरत असतात अन् त्या वास्तूचे रक्षण करत असतात.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरूवण्णमलई, तमिळनाडू. (१३.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक