सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत लघुउद्योजक ते यशस्वी मोठे उद्योजक अशी वाटचाल करून साधनेतही प्रगती करणारे ठाणे येथील श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे) !

‘४.२.२०२५ या दिवशी श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरीचे संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत व्यवसाय केल्याने व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होणे 

‘वर्ष १९९९ पासून श्री. रवींद्र प्रभुदेसाई सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. त्यांनी साधना केल्यामुळे आणि व्यवसाय साधना म्हणून करायला आरंभ केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली, तसेच त्यांनी परात्पर गुरु पांडे महराज यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व्यवसाय केल्यामुळे त्यांची व्यवसायातही भरभराट झाली. यात त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांची पत्नी सौ. वृषाली, मुलगा श्री. परिक्षित, सून सौ. प्रिया आणि मुलगी कु. प्रियांका हेही सहभागी झाले. श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या आई (पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई (वय ८९ वर्षे, सनातनच्या ४९ व्या (व्यष्टी) संत) संतपदी विराजमान आहेत.

२. श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना विविध संस्थांकडून मिळालेले गौरव पुरस्कार ! 

श्रीमती स्मिता नवलकर

त्यांनी त्यांच्या व्यवसायात केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना विविध संस्थांकडून आतापर्यंत एकूण ३६ गौरव पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची लघु उद्योजक ते यशस्वी मोठे उद्योजक अशी प्रगती झाली.

अ. मराठी व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने – यशस्वी उद्योजक पुरस्कार २००३

आ. ‘इकाॅनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया’, देहलीच्या वतीने – राष्ट्रीय उद्योग प्रतिभा पुरस्कार २००४

इ. ‘जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री’च्या वतीने – उद्योगरत्न पुरस्कार २०१३

ई. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने – समाजभूषण पुरस्कार २०१४

उ. ‘टाइम्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या वतीने – एमिनंट लिडर इन बिझनेस ॲवॉर्ड २०१८

. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने – India SME 100 पुरस्कार २०१९

ए. ‘एशिया वन’ संस्थेच्या वतीने – इंडियाज् ग्रेटेस्ट ब्रँड्स २०१८-१९

ऐ. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने – कोकण उद्योगरत्न पुरस्कार २०२२

ओ. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन’च्या वतीने – उद्यम कौस्तुभ पुरस्कार २०२३

औ. पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने – जीवनगौरव पुरस्कार २०२४

३. दातृत्व

ते अनेक सामाजिक संस्थांना साहाय्य करतात. ते मराठी भाषिक मुलांना शिक्षण घेण्यात साहाय्य करतात. ते मराठी भाषिक मुलांना नोकरी आणि व्यवसाय यांच्या संधी उपलब्ध करून देतात. त्यांना ‘मराठी भाषिक मुलांनी कुठेही काही न्यून पडू नये’, असे वाटते.

४. नम्रता

श्री. रवींद्र प्रभुदेसाई मोठ्या पदांचे मानकरी झाले; मात्र त्यांच्यातील नम्रता जराही ढळली नाही. ते सर्वांशी आदराने आणि नम्रतेने वागतात. हे फारच कौतुकास्पद आहे.

५. ते सर्व गोष्टींचे श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना देतात. त्यांची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे.

‘श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची अशीच व्यवसाय आणि अध्यात्म यांत प्रगती होत राहो’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.२.२०२५)