वॉशिंग्टन – कॅनडा आणि मेक्सिको येथून आयात होणार्या उत्पादनांवर २५ टक्के शुल्क, तर चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘युरोपीय देशांवर शुल्क लादणार’, असे विधान केले आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी असे केले, तर जगभरात ‘शुल्क युद्ध’ चालू होण्याचा धोका आहे.
१. डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ताज्या वक्तव्यात म्हटले आहे की, युरोपीयन युनियनने अमेरिकेचा मोठा लाभ घेतला आहे. ते म्हणाले की, ते लवकरच या विषयावर निर्णय घेतील. ट्रम्प यांनी २७ देशांच्या युरोपीय युनियनसोबतच्या वाढत्या व्यापार तूटीचाही उल्लेख केला.
२. युरोपीय युनियनच्या प्रवक्त्याने प्रत्युत्तर देतांना म्हटले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपीय उत्पादनांवर मनमानी शुल्क लादल्यास युरोपीय युनियन त्याला योग्य प्रत्युत्तर देईल.