वॉशिंग्टन – १ फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांतून आयात होणार्या उत्पादनांवर शुल्क घोषित केले; मात्र यात त्यांनी भारताचे नाव घेतले नाही. याआधी फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात त्यांनी भारत, चीन आणि ब्राझिल या देशांवर उच्च शुल्क लादण्याची धमकी दिली होती.
१. ट्रम्प यांनी अनेक वेळा ‘ब्रिक्स’ देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याची धमकी दिली होती. भारत, ब्राझिल आणि चीन हे तिन्ही ‘ब्रिक्स’चे भाग आहेत. यासह भारताने अमेरिकी उत्पादनांवर अधिक शुल्क लादल्याची तक्रार ट्रम्प यांनी केली आहे. अशा स्थितीत भारतावरही दरवाढीचा धोका निर्माण झाला होता.
२. तज्ञांचा असा अंदाज आहे की, चिनी उत्पादनांवर १० टक्के शुल्क लागू केल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंसाठी अधिक संधी निर्माण होतील.