बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी हिंदूंना श्री सरस्वतीदेवीच्या पूजेनिमित्त दिल्या शुभेच्छा !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी वसंत पंचमीच्या दिवशीच्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजेनिमित्त अल्पसंख्य हिंदूंना शुभेच्छा दिल्या. बांगलादेशातील हिंदूंनी ३ फेब्रुवारीला श्री सरस्वतीदेवीची पूजा केली. युनूस यांनी बांगलादेशातील सर्व हिंदूंना देशाचा विकास आणि प्रगती यांसाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले. त्यांनी देशातील सर्व नागरिकांसाठी शांती, कल्याण आणि समृद्धी यांसाठी प्रार्थना केली.
‘All Hindus Should Dedicate Themselves to the Nation’s Development and Progress!’ – Muhammad Yunus’ Appeal to Bangladeshi Hindus after extending greetings to Hindus on the occasion of Shri Saraswati Pooja
If Hindus remain alive in Bangladesh, they might contribute to the nation;… pic.twitter.com/Da3SJbRwYS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2025
२ फेब्रुवारीला महंमद युनूस यांनी दिलेल्या संदेशात म्हटले होते की, बांगलादेश धार्मिक सलोख्याचे माहेरघर आहे. सहस्रो वर्षांपासून या देशात सर्व जाती, रंग आणि धर्म यांचे लोक एकत्र रहात आहेत. आपला देश धर्म किंवा जात काहीही असो, सर्व लोकांचे घर आहे. अंतरिम सरकार सर्वांचे जीवन सुधारण्यासाठी आणि जात, धर्म अन् वंश यांची पर्वा न करता त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. श्री सरस्वतीदेवी सत्य, न्याय आणि ज्ञानाचा प्रकाश यांचे प्रतीक आहे. ती ज्ञान, वाणी आणि गोडवा यांची शक्ती आहे.
संपादकीय भूमिका
|