साधिकेला स्‍वप्‍नात श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्‍यावर तिने अनुभवलेली भावस्‍थिती !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. साधिकेला स्‍वप्‍नात दिसलेले दृश्‍य

सौ. आराधना गाडी

‘२६.१२.२०२४ या दिवशी पहाटे मला स्‍वप्‍नात दिसले, ‘मी सेवेच्‍या निमित्ताने बेंगळुरू (कर्नाटक) येथे माझ्‍या घरी गेले आहे. मला माझ्‍या सासूबाईंनी (सौ. पद्मा जनार्दन गाडी, वय ६७ वर्षे यांनी) सांगितले, ‘आराधना, मला चहा करून दे.’ तेव्‍हा मी चहा करायला ठेवला आणि भांडी घासू लागलेे. तेव्‍हा अकस्‍मात् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि त्‍यांच्‍या समवेत काही साधक आमच्‍या घरी आले.

२. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाल्‍यावर साधिकेने अनुभवलेली भावस्‍थिती

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होताच मी भावविभोर होऊन एका वेगळ्‍याच विश्‍वात गेले. त्‍या वेळी माझे मन आनंदाने डोलत होते. मला माझ्‍या अनाहतचक्राच्‍या ठिकाणी वेगळ्‍याच संवेदना जाणवू लागल्‍या. ‘माझ्‍या हृदयमंदिरात एक सुंदर कमळपुष्‍प फुलले आहे’, असे मला जाणवले. मी माझ्‍या अंतरात श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍याप्रती वेगळाच भाव अनुभवत होते. माझ्‍या डोळ्‍यांतून अखंड भावाश्रू वहात होते. माझ्‍या मुखातून एक शब्‍दही बाहेर पडत नव्‍हता. मी स्‍तब्‍ध झाले. मी पुष्‍कळ वेळ त्‍याच भावस्‍थितीत होते. ‘त्‍या भावस्‍थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.

श्री. विनायक शानभाग (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४२ वर्षे) यांनी माझ्‍या भावस्‍थितीविषयी जाणले आणि ते त्‍याविषयी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगू लागले.’

३. मला जाग आल्‍यानंतर ‘स्‍वप्‍नात दिसल्‍याप्रमाणे मी प्रत्‍यक्ष अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते. मला झोप येतच नव्‍हती. ‘मी त्‍या भावस्‍थितीतच नामजप करू लागले आणि ‘सकाळ कधी झाली ?’, हे मला समजलेच नाही.

४. या अनुभूतीचे टंकलेखन करतांनाही मी तीच भावस्‍थिती अनुभवत होते.

‘हे गुरुमाऊली, केवळ तुमच्‍या कृपाशीर्वादानेच मला ही भावस्‍थिती अनुभवता आली’, त्‍याबद्दल मी आपल्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक