दाऊदच्‍या टोळीतील गुंडाला २९ वर्षांनी अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – आतंकवादी दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड प्रकाश हिंगू (वय वर्षे ६३) याला मुंबई पोलिसांनी ३१ जानेवारी या दिवशी कर्नाटकमधील हुबळीतमध्‍ये अटक केली. वर्ष १९९६ मध्‍ये दाऊद आणि छोटा राजन या टोळीतील गुंडांनी कारागृहात एकमेकांवर मारामारी करत जीवघेणे आक्रमण केले होते. हत्‍येच्‍या प्रयत्नांच्‍या गुन्‍ह्याच्‍या प्रकरणी त्‍याला जामीन मिळाला होता. न्‍यायालयीन सुनावणीला अनुपस्‍थित राहून तो पसार झाला होता. वर्ष २००५ मध्‍ये त्‍याला पसार घोषित केले होते. २९ वर्षांनी पोलिसांना पकडले आहे. तो कर्नाटकात ओळख लपवून रहात होता.