उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडून अर्थसंकल्‍पाचे स्‍वागत

निर्मला सीतारमण आणि अजित पवार

मुंबई – उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्‍पाचे स्‍वागत करून म्‍हणाले की, देशातील शेतकरी, कष्‍टकरी, व्‍यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्‍य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पातून देशातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला विकासाची संधी, प्रत्‍येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्‍ट्र बनण्‍याच्‍या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्‍प आहे. यातून महाराष्‍ट्राच्‍या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्‍पातून महाराष्‍ट्रातील पायाभूत प्रकल्‍पांसाना भरीव निधी मिळाला असून त्‍यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे आभार.

अर्थसंकल्‍पात विविध वस्‍तू-सेवांवरील ७ प्रकारचे शुल्‍क हटवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. त्‍यामुळे त्‍या वस्‍तू-सेवा स्‍वस्‍त होतील. देशात निर्माण होणारे कपडे, चामड्याच्‍या वस्‍तू, मत्‍स्‍योत्‍पदनांवरील शुल्‍क अल्‍प झाल्‍याने महाराष्‍ट्राला त्‍याचा लाभ होईल, असा विश्‍वास उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्‍यक्‍त केला.