प्रयागराजचा अक्षय्यवट, जहांगीर आणि छत्रपती शिवाजी महाराज

प्रयागराजचा अक्षय्यवट

‘मोगल बादशाह जहांगीराने प्रयागराज येथील अक्षय्यवट मुळापर्यंत तोडून त्याच्या मुळात लोखंडाचा एक तापलेला मोठा हंडा ठोकला होता. हिंदूंच्या पवित्र अक्षय्यवटाला आपण मारून टाकले, अशी स्वप्रशंसा करून तो प्रसन्न झाला ! परंतु काय आश्चर्य ! एका वर्षांतच अक्षय्यवट पुन्हा वाढू लागला आणि आपल्या मुळात मारलेला तो लोखंडाचा जड हंडा त्याने उलथवून टाकला !

हिंदुत्वाचा वृक्ष मेलेला नाही, अनेक शतकांच्या राजकीय गुलामीचे, प्रशासनातून निष्कासित केल्याचे आणि कायद्याच्या दबावाचे ओझे बाजूला सारून तो पुन्हा फोफावू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. हिंदुत्वाच्या या वृक्षाला पुन्हा पालवी आणि फांद्या फुटू शकतात अन् तो आपली मान आकाशात उंचावू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले !’

(साभार : जदुनाथ सरकार यांच्या ‘शिवाजी’ या पुस्तकातून)