मंचर (पुणे) येथे श्री कळंबादेवीमाता भंडारा उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान !

मंचर (जिल्हा पुणे), ३१ जानेवारी (वार्ता) – शेवाळवाडी मंचर येथे श्री कळंबादेवीमाता भंडारा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सकाळी देवीला हारतुरे आणि मांडवडाळे अर्पण करण्यात आले, तसेच होम हवन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्री कळंबादेवीमाता मंदिर ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ शेवाळवाडी यांनी केले होते. सायंकाळी ह.भ.प. रोहित महाराज थोरात यांचे प्रवचन झाले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या सातारा जिल्हा समन्वयक सौ. भक्ती डाफळे यांचे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि महिलांचे सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान झाले. सदर व्याख्यानाला पंचक्रोशीतील ५०० ते ६०० भाविक उपस्थित होते. सायंकाळी श्री कळंबादेवीमाता भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होऊन सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

सौ. भक्ती डाफळे यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात मांडले, तसेच लव्ह जिहाद विषयी समाजाला जागृत केले आणि नामजपाच्या माध्यमातून आनंदी जीवन कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन केले.