साधक नामजपादी उपाय करत असतांना त्‍याला श्रीरामाने सूक्ष्मातून आपत्‍काळात होणार्‍या युद्धाविषयी सांगणे

‘७.११.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस होता. मी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजपादी उपाय करत होतो. त्‍या वेळी मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.

श्री. नंदकिशोर नारकर

१. भूमी आणि आकाश या ठिकाणी युद्ध चालू होणार असणे

नामजपादी उपाय करतांना माझे डोळे बंद होते. त्‍या वेळी मला श्रीरामाच्‍या चित्रातून शब्‍द ऐकू आले, ‘आता दिवाळी झाली आहे. श्रीकृष्‍णाने पाताळातील सर्व अनिष्‍ट शक्‍तींचा नाश केला आहे. आता अल्‍प कालावधीत भूमी आणि आकाश या ठिकाणी युद्ध चालू होणार आहे. या युद्धामध्‍ये हनुमंत आणि श्री दुर्गादेवी हे सेवक अन् शक्‍ती उपासक यांना समवेत घेऊन सर्व अनिष्‍ट शक्‍तींना नष्‍ट करणार आहेत. हनुमंत आणि श्री दुर्गादेवी हे सेवक अन् शक्‍ती उपासक यांना योग्‍य कृती करण्‍याविषयी मार्गदर्शन करत आहेत.

२. हनुमंत आणि श्री दुर्गादेवी हे साधक अन् सेवक यांना समवेत घेऊन युद्ध जिंकणार असणे

त्रेतायुगात श्रीरामाने लंकेत जाऊन रावणाचा वध केला. तेव्‍हा त्‍याच्‍यासह वानर (म्‍हणजे सेवक) होते. द्वापरयुगात श्रीकृष्‍णाने गोकुळातून द्वारकेला जाऊन कंसाचा वध केला. तेव्‍हा त्‍याच्‍यासह त्‍याचे गोपाळ (म्‍हणजे सेवक, दास) होते. त्‍याचप्रमाणे आता हनुमंत आणि श्री दुर्गादेवी हे साधक अन् सेवक यांना समवेत घेऊन कलियुगातील युद्ध जिंकणार आहेत.’

‘अशी सुंदर माहिती श्रीरामाने त्‍या दिवशी मला दिली’, त्‍याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे. मला ही अनुभूती सलग ३ दिवस येत होती.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक