

प.पू. गुरुदेवांनी आम्हाला आणले देवद आश्रमात ।
सद़्गुरु दादा (टीप १), तुमच्या कृपाछत्रात ॥ १ ॥
प्रेमाचा झरा सतत वहातो इथे ।
सद़्गुरु दादा, तुमचे अस्तित्व जिथे ॥ २ ॥
भगवान शिवाची ज्ञानगंगा अवतरते पृथ्वीवरी ।
सद़्गुरु दादा, आढाव्याच्या (टीप २) रूपाने तुमची कृपा असे साधकांवरी ॥ ३ ॥
चैतन्याचा प्रवाह आश्रमात पसरतो दूरवर ।
सद़्गुरु दादा, जिथे तुमचा सहजपणे असे वावर ॥ ४ ॥
देवद आश्रमातील उपायांची संजीवनी (टीप ३) ।
सद़्गुरु दादा, आमच्या त्रासात (टीप ४) तुम्ही आधार असता धन्वंतरि बनूनी ॥ ५ ॥
आनंदाचे तरंग सर्वदूर पसरतात ।
सद़्गुरु दादा, तुमच्या निखळ हास्याने आमचे नेत्र हे अनुभवतात ॥ ६ ॥
‘ईश्वरप्राप्ती’ हे सुनिश्चित होते ध्येय ।
सद़्गुरु दादा, तुमच्या दृष्टीक्षेपाने आमच्यात श्रद्धा निर्माण होते अढळ ॥ ७ ॥
वर्णाया तुमची महती, अनुभवण्या तुमची कृपा ।
सद़्गुरु दादा, या जिवाला भाव-भक्तीची भीक घाला ॥ ८ ॥
तुमच्या चरणी शरणागतभावाने असे केवळ ।
कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता ॥ ९ ॥
टीप १ – सद़्गुरु राजेंद्र शिंदे
टीप २ – सद़्गुरु राजेंद्रदादा देवद आश्रमातील काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात.
टीप ३ – आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांचे त्रास दूर करणेे
टीप ४ – आध्यात्मिक त्रासात’
– सौ. राधा साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|