
१. ज्याला जे आवश्यक आहे, ते देव करत असल्याने साधकांनी देवाकडे काही मागायची आवश्यकता नसते !

श्रीमती माधवी घाटे (वय ६९ वर्षे) : परम पूज्य, मासातून एकदा तुम्ही केवळ तुमच्या खोलीच्या बाहेर येऊन उभे रहात जा, म्हणजे सगळे साधक तुम्हाला पहातील आणि त्यांचे मन तृप्त होईल. ते त्यांची सेवाही छान करू शकतील.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण देवाकडे काही मागायचे नाही. ‘कुणाला काय आवश्यक आहे ?’, ते देव करतो ना ! आपण कशाला मागायचे ? समाजातील लोक मंदिरात जातात आणि देवाकडे मागतात; पण आपण साधक आहोत ना ?
२. ‘समाधान’ म्हणजे आनंद आणि तो मिळवण्यासाठी साधना वाढवायला हवी !
श्रीमती माधवी घाटे : परम पूज्य, मला माझ्या साधनेतून मुळीच समाधान मिळत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : समाधान होत नाही, तर समाधान होईपर्यंत साधना करायला हवी. समाधान होत नाही, तर साधना वाढवली पाहिजे आणि ती भावपूर्ण करायला हवी. असे करत गेल्यावर मग समाधान मिळायलाच लागते. ‘समाधान’ म्हणजे आनंदच असतो !