
मुंबई – अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवर आकारण्यात येणारा २५० रुपयांचा पथकर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तसाच ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला संमती देण्यात आली आहे.