३० जानेवारी : बेळगाव, कर्नाटक येथील प.पू. कलावतीआई यांची पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

बेळगाव, कर्नाटक येथील प.पू. कलावतीआई यांची आज पुण्यतिथी

प.पू. कलावतीआई

‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्‍याच्या झुळकीसरशी उडणार्‍या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल, तर गुरूंच्या वागण्यातील मर्म न समजता त्याचे मन शंका-कुशंकांनी भरून जाते.’

– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘शिष्य’, सुवचन क्र. ३)