पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचा आदेश !
पुणे – येथे अवैध वास्तव्य करणार्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितकुमार यांनी दिले आहेत. शहर पोलील दलातील विशेष शाखेच्या परदेशी नागरिक नोंदणी (एम्.आर्.ओ.) विभागाच्या वतीने व्यापक पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत एन्.आय.बी.एम्. (कोंढवा) परिसरातील एका सोसायटीतील २ महिलांसह ७ येमेनी नागरिकांच्या पारपत्राची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करत त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस (लिव्ह इंडिया) बजावण्यात आली. या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची कारवाई चालू केली आहे.