हे भगवंता, तुझ्या पायी सर्वस्व समर्पण ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

क्षणभराच्या दर्शनासाठी
आसुसले रे नेत्र माझे ।

सौ. स्वाती शिंदे

वाट पाहुनी थकले देवा,
दर्शन कधी घडेल तुझे ।
मग काय झाले,
किंचित द्वार उघडले देवाचे ।
क्षणभर दर्शन घडले त्याचे ।। १ ।।

पारणे फिटले नयनांचे ।
हास्य फुलले चेहर्‍यावरचे ।
भाव उमलले हृदयाचे ।
शब्द स्फुरले कृतज्ञतेचे ।। २ ।।

हे भगवंता, तुझ्या पायी सर्वस्व समर्पण ।
अंतरातील दर्पणात तूच असशी ही मनास राहू दे जाण ।। ३ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०२३)