UT Khader Mahakumbh Visit : कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांनी महाकुंभमेळ्यास दिली भेट : संगमात केले पवित्र स्नान !

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर (डावीकडून दुसरे)

प्रयागराज – कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांनी प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यास भेट दिली आणि संगमात पवित्र स्नान केले. त्यांनी नागा साधूंना भेटून भारताच्या पूर्ण संस्कृतीचे दर्शन घेतले.

मंगळुरू विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार यू.टी. खादर महाकुंभमेळ्याविषयी बोलतांना म्हणाले की, महाकुंभमेळ्यात भारताची संस्कृती पाहायला मिळते. एक व्यक्ती म्हणून आपल्याला देशातील सर्व ठिकाणी जाणे शक्य नाही; परंतु अशा महाकुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमामध्ये एका ठिकाणी विविधतापूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते.