काश्मीरमधील केबलवाहिन्यांवरून हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण

  • पीडीपी-भाजप यांच्या राज्यात आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर यांची भाषणे कशी प्रसारित होतात ?
  • काश्मीर भारतात आहे कि पाकमध्ये ? केबलवाहिन्यावरील हिंदुद्वेषी भाषणे रोखू न शकणारे सरकार आतंकवाद्यांना कसे रोखणार ?

श्रीनगर – काश्मीरमधील स्थानिक केबलवाहिन्यांमधून हिंदुद्वेषी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण करण्यात येत आहेत. हिंदु धर्मावर टीका करणारी ही भाषणे आहेत. डॉ. झाकीर यांच्या पीस टीव्हीवर यापूर्वी केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, या भाषणांमध्ये डॉ. झाकीर इस्लाम सर्व धर्मांचा मालक आहे. इस्लाम ख्रिस्ती, ज्यू आणि हिंदू यांच्यावर विजय मिळणार आहे, असे म्हणतांना दाखवण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF