आमच्याकडे भक्कम पुरावे ! – मुंबई पोलीस

सैफ अली खानवरील आक्रमणाचे प्रकरण 

अभिनेता सैफ अली खान

मुंबई – अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी बोटांच्या ठशांचे अधिकृत अहवाल आम्हाला मिळालेले नाहीत. आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. आरोपीच्या वडिलांच्या स्टेटमेंटविषयी मला काही सांगायचे नाही. आमच्याकडे आरोपीच्या विरुद्ध सर्व प्रकारचे भक्कम पुरावे आहेत. त्यामध्ये तोंडी साक्ष, तांत्रिक पुरावे, तसेच शारीरिक स्तरावरील पुरावे आहेत, असे मुंबई पोलिसांनी २८ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपी बांगलादेशी असल्याचेही तांत्रिक आणि भक्कम पुरावे मिळाले आहेत. आरोपी ज्या लोकांच्या संपर्कात होता, त्यांच्या साक्षी आम्ही घेत आहोत, असेही पोलीस अधिकार्‍यांनी या वेळी सांगितले.