सनातन संस्थेच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी पंचतत्त्वांचे काही सूक्ष्माशी संबंधित प्रयोग केले. तेव्हा साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका सत्संगात आम्हा साधकांना डोळे मिटून आणि उजवा हात वर करून बसायला सांगितले. त्या वेळी प्रत्येकाला ‘काय जाणवते ?’, ते विचारले. थोडा वेळ मी हात वर केला असता ‘माझ्या तळहाताच्या बोटांपासून ते मनगटापर्यंत हाताला मंद वार्याची झुळूक गारवा, म्हणजेच चैतन्य देऊन गेली’, असे मला जाणवले.
२. पू. (सौ.) परांजपेआजी यांनी आपल्या उजव्या हातांची पाचही बोटे एकत्रितरित्या पाण्यात बुडवली. त्या वेळी त्यांच्या बोटांमधील चैतन्य त्या पाण्यात जाऊन विविध रंगांचे दर्शन घडले.
३. आम्हा सर्व साधकांसमोर काळा पडदा ठेवण्यात आला. त्यापुढे पू. (सौ.) परांजपे आजींना हात धरून ठेवण्यास सांगितले. त्या वेळी पू. (सौ.) आजींच्या हाताच्या पाचही बोटांमधून धूर निघत असलेला मला दिसला. त्यांच्या मधल्या बोटातून पुष्कळ धूर निघत असल्याची अनुभूती मला आली.
४. पू. (सौ.) परांजपेआजींनी त्यांच्या हाताची पाचही बोटे पंख्याच्या दिशेने धरल्यावर ‘पंख्याची गती न्यून होत गेली. ‘त्यांनी त्यांचे चरण पंख्याच्या दिशेने धरले असता पंख्याची गती आणखीन न्यून झाली’, असे मला जाणवले.
५. पू. (सौ.) परांजपे आजी यांच्या तळहातावर विजेरीचा प्रकाश पाडून त्यांच्यासमोर काळा पडदा ठेवला. समोर ध्वनीचित्रीकण कक्षातील एक कॅमेरा ठेवण्यात आला. त्या वेळी त्या कॅमेर्याची सावली त्या काळ्या पडद्यावर उमटून त्या पडद्यावर तेजस्वी प्रकाश मला दिसला.
६. तुलनेसाठी हा प्रयोग तिथल्या एका साधकालाही करण्यास सांगितला. त्या वेळी मला तेजस्वीपणा अल्प प्रमाणात दिसून आला. वस्तूची ठळकताही मला अल्प प्रमाणात दिसली.
७. पू.(सौ.) परांजपे आजी यांना तळहात डोंगराच्या दिशेने धरण्यास सांगितला. तेव्हा तो डोंगर आणि डोंगराची कडा मला तेजस्वी झालेली दिसली.
हे प्रयोग केल्यानंतर संतांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असते. ‘साधनेमधील सातत्य आणि आध्यात्मिक प्रगती झाली की, देहाला चकाकी येते’, असे मला वाटले.’
– कु. मृणाली यादव, सांगली
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |