Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभमेळा प्रकाशित करण्यासाठी टाकण्यात आल्या आहेत १ सहस्र ५७८ किलोमीटर विद्युत् वाहिन्या !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

रात्रीच्या वेळेत विजेच्या दिव्यांद्वारे लखलखणारे कुंभक्षेत्र !

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) : रात्रीच्या वेळेत विजेच्या दिव्यांद्वारे लखलखणारे कुंभक्षेत्र उंचावरून अतिशय मनमोहक वाटत आहे; मात्र या सर्व कुंभमेळ्यामध्ये ही सर्व विद्युत् यंत्रणा उभी करण्यासाठी कुंभक्षेत्रात तब्बल १ सहस्र ५७८ किलोमीटर विद्युत् वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेश शासनाच्या ‘पूर्वांचल विद्युत् वितरण निगम मर्यादित’कडून हे भव्य दिव्य काम करण्यात आले आहे. कुंभक्षेत्रात १७३ किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या, तर १ सहस्र ४०५ किलोमीटर लांबीच्या अल्पदाबाच्या विद्युत् वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यासाठी कुंभक्षेत्रात तब्बल ६७ सहस्र २६ वीजेचे खांब उभारण्यात आले आहेत.