Prayagraj Airfare : प्रयागराजसाठीच्या विमानांचे भाडे अल्प करण्यासाठी केंद्र सरकारची विमान आस्थापनांना सूचना

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार्‍या विमानांच्या तिकिटांच्या मूल्यांत विमान आस्थापनांनी अनेक पटींनी वाढवल्यानंतर जनतेकडून टीका होत आहे. आता केंद्र सरकारकडून भाडे अल्प करण्याकरता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले, ‘प्रयागराजच्या विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि महाकुंभाच्या पार्श्‍वभूमीवर वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढवण्यात आली आहे.’ सध्याच्या नियमांनुसार विमान भाडे नियंत्रणमुक्त आहे आणि सरकारचे नियंत्रण नाही.

संपादकीय भूमिका

नुसती सूचना करून विमान आस्थापनांवर कोणताही परिणाम झालेला नाही. एक रुपयानेही भाडे अल्प करण्यात आलेले नाही. यावरून सरकारच्या सूचनेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यातून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. सरकारने इच्छाशक्ती दाखवून प्रयत्न केला, तरच जनतेला हायसे वाटेल !