प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्याला प्रारंभ होऊन १४ दिवस झाले. प्रतिदिन स्नानासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत आहेत. मौनी अमावास्याच्या पूर्वी २८ जानेवारी या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३ कोटी ९० लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. ही संख्या आजपर्यंतची सर्वांत अधिक आहे.