पुणे – ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.) या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणार्यांना विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयात उपचार घेणार्यांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय आर्थिक साहाय्य केले जाईल. नेहरू रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार घेणार्यांना ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ इंजेक्शन महापालिका विनामूल्य उपलब्ध करून देईल.