हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याचे नायब तहसीलदारांचे आदेश !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा अभियान !

तासगाव येथे नायब तहसीलदार प्रकाश बरगुले (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी 

तासगाव (जिल्हा सांगली), २७ जानेवारी (वार्ता.) – ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तासगाव येथे नायब तहसीलदार प्रकाश बरगुले यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर त्यांनी तात्काळ कृती करत हे निवेदन नगर परिषद आणि नगरपंचायत ग्रामपंचायत यांना पाठवले. हे निवेदन तासगाव पोलीस ठाण्यातही देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, श्री. आनंदराव धनवडे, हिंदु जनजागृती समितीचे गजानन खेराडकर, सचिन कुलकर्णी, धर्माभिमानी सर्वश्री माळी, देशमुख, पुरण मलमे उपस्थित होते.

ईश्वरपूर येथे जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक १ आणि ६ येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

या अभियानाच्या अंतर्गत सांगली, मिरज, कुंडल, ईश्वरपूर, बत्तीस शिराळा येथील विविध प्रशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. ईश्वरपूर, बत्तीसशिराळा येथे निवेदन देण्यात साधना सत्संगातील जिज्ञासूंचा सहभाग होता. ईश्वरपूर येथे शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक ६ येथे निवेदन दिल्यानंतर शिक्षकांनी लगेचच विद्यार्थ्यांकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यांसाठी प्रयत्न करू’, अशी प्रतिज्ञाही करवून घेतली.

कोल्हापूर – कोल्हापूर येथे हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले. निवेदनावर तात्काळ कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले.