
प्रश्न : प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील आगाशीच्या दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांची कड आगाशीच्या भिंतीच्या पांढर्या रंगाची पार्श्वभूमी असलेल्या भागावर पाहिली असता कडांना गुलाबी रंगाची प्रभावळ दिसली. त्याचे कारण काय ?
उत्तर : ‘दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांची कड यांना प.पू. डॉक्टरांच्या हातांचा स्पर्श होत असल्याने प.पू. डॉक्टरांमध्ये कार्यरत असणार्या आनंददायी प्रीतीच्या लहरींचे संक्रमण या वस्तूंमध्येही झालेले आहे. आगाशीच्या भिंतीच्या पांढर्या रंगाची पार्श्वभूमी असलेल्या भागात सगुण चैतन्याचे प्रमाण अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांच्या कडांना गुलाबी रंगाची प्रभावळ दिसली. कागदाच्या तुलनेत दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांना प.पू. डॉक्टरांचा अल्प कालावधीसाठी स्पर्श होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कागदाच्या तुलनेत अधिक निर्गुण चैतन्य कार्यरत असल्यामुळे या वस्तूंवर दिसणारा गुलाबी रंग कागदावर दिसणार्या गुलाबी रंगाच्या तुलनेत अधिक फिकट आहे, तर दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांच्या कडांना दिसणार्या गुलाबी रंगामध्ये तेजतत्त्वाचे प्राबल्य अधिक असल्यामुळे त्यांवर गुलाबी रंगाच्या प्रकाशाची प्रभावळ कार्यरत असल्याप्रमाणे दिसत आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
|