Rajapur Unauthorized Madrassa :जोपर्यंत अनधिकृत मदरसा बंद होत नाही तोपर्यंत माघार नाही ! – उपोषणकर्त्या ग्रामस्थांची चेतावणी

धोपेश्वर पन्हळे (राजापूर) येथील अनधिकृत मदरसा

राजापूर – तालुक्यातील धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा यापूर्वीच्या शासनाच्या आदेशांना न जुमानता चालूच आहे. स्थानिक प्रशासनाने या अनधिकृत मदरशाविषयी कोणतीही कारवाई न केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून चालू केलेले आमरण साखळी उपोषण सलग दुसर्‍या दिवशीही चालू आहे. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद केला जात नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी चेतावणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी दिली आहे.

याविषयी २६ जानेवारीला उपोषणस्थळी प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी भेट देऊन या प्रकरणी ८ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती; मात्र मागील वर्षभर प्रशासनाने या प्रकरणी काहीच केलेले नाही, त्यामुळे तुम्ही  अनधिकृत मदरशावर प्रथम कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही उपोषण स्थगित करतो अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या उपोषणस्थळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह, हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर यांनी भेट देत उपोषणकर्त्यांना पाठिंबा घोषित केला.

संपादकीय भूमिका

अनधिकृत मदरशासाठी जनतेला उपोषण करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !