|

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणार्या चित्रांचा मूळ राज्यघटनेत समावेश आहे; परंतु त्यांच्या वितरण करण्यात येणार्या प्रतींमध्ये त्यांचा समावेश नाही. तो करण्यात यावा, अशी मागणी राजस्थान येथील निरंजनी आखाडा तथा बिकानेर (राजस्थान) येथील शिवमठ शिवबाडी येथील श्री लालेश्वर महादेव मंदिराचे महंत स्वामी विमर्शानंदगिरि महाराज यांनी केली. स्वामीजींनी २६ जानेवारी २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने कुंभक्षेत्रातील मोरी मार्ग येथे लावलेल्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
स्वामीजी पुढे म्हणाले,
१. वेद ही संपूर्ण विश्वाची राज्यघटना आहे. आपल्या राज्यघटना सभेनेही भारतियांच्या भावना लक्षात घेऊन आपली घटना सिद्ध केली आहे. मूळ राज्यघटनेत भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणार्या २२ वेगवेगळ्या चित्रांचा समावेश, हे त्याचे प्रमाण आहे. या चित्रांमध्ये भगवान नटराज, श्री हनुमंत, अर्जुन, गंगा नदी अवतरण, श्रीरामाचा लंका विजय आदी चित्रांचा यात समावेश आहे.
२. राज्यघटना सभेतील सर्व सदस्यांचा उद्देश हा भारतियांच्या भवनांचा आदर करणे, हा होता. तथापि गेल्या ५० वर्षांपासून ही चित्रे राज्यघटनेच्या वितरण करण्यात येणार्या प्रतींमध्ये दिसत नाहीत. तथापि मूळ राज्यघटनेत, तसेच संकेतस्थळावरही ही चित्रे उपलब्ध आहेत.
३. आमची अशी मागणी आहे की, लोकशाहीच्या चारही स्तंभांचे हे दायित्व आहे की, त्यांनी मूळ संविधानातील देवता, भारतीय संस्कृती, तसेच धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांच्या संदर्भातील चित्रे समाजासमोर आणावीत. एवढेच नव्हे, तर त्याचा प्रचार-प्रसारही करावा. असे केले, तर भारत हिंदु राष्ट्र बनेल, अखंंड बनेल. ही चित्रे सनातन राष्ट्राचे प्रतिबिंब असल्याने राज्यघटनेच्या प्रतींमध्ये त्याचा समावेश करून त्याचे वितरण करावे.