Police Alert to Akhadas : कुंभमेळ्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून आखाड्यांना सतर्कतेची सूचना !

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – मौनी अमावस्येच्या पार्श्‍वभूमीवर कुंभक्षेत्रात भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सर्व आखाड्यांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. अनोळखी व्यक्तींना आखाड्यांमध्ये रहायला देऊ नका, अशी सूचना पोलीस अधिक्षक कार्यालयातून सर्व आखाड्यांना देण्यात आली आहे.

मौनी अमावास्येच्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी २६ जानेवारीपासून कुंभक्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. यामध्ये अनेक भाविक हे आखाडे, तसेच वेगवेगळ्या धार्मिक संस्था यांच्याशी संबंधित आहेत. आखाडे आणि अध्यात्मिक संस्था यांच्याशी संबंधित भाविक आखाडे किंवा आध्यात्मिक संस्था यांच्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी जात आहेत; मात्र त्यांच्यासमवेत कुणी अनोळखी व्यक्ती येत नाही ना ? याविषयी आखाड्यांनी दक्षता घेण्याची सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी काही धर्मांध मुसलमानांनी महाकुंभमेळ्यामध्ये घातपात करण्याची धमकी दिली आहे. या दृष्टीने सावधगिरीच्या दृष्टीने पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात येत आहे.