
‘मला जवळजवळ १० – १२ वर्षे निद्रानाशाचा त्रास होता. मी रात्रभर जागा असायचो आणि दिवसभर झोपायचो. अनेक उपाय केले; पण त्यांचा परिणाम झाला नाही.

मी रामनाथी आश्रमात आल्यापासून माझे नामजपादी उपाय परिणामकारक होऊ लागले आहेत. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेल्या जपामुळे माझा निद्रानाशाचा त्रास न्यून झाला आहे. आता मी सकाळी उठत आहे. हे सर्व आपले कृपाशीर्वाद आणि आश्रमातील सात्त्विक वातावरण यांमुळे शक्य झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : म्हणजे तुम्ही आश्रमाचे महत्त्व अनुभवले.’
– श्री. निवृत्ती चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |