मुंबई – पुढील २ वर्षांत कार्यरत होणार्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यात अधिक प्रमाणात वीजनिर्मिती होऊन सर्वच स्तरांतील ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे.
घरगुती ग्राहक, उद्योजक आणि शेतकरी या सर्वांनाच शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ या योजनेचा लाभ होणार आहे. आगामी ५ वर्षांत वीज दर टप्प्याटप्प्याने अल्प होत जातील. घरगुती ग्राहकांसाठी ११.८२ रुपये प्रतियुनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने अल्प होतील. याविषयीची माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी नुकतीच दिली. औद्योगिक ग्राहकांना ‘क्रॉस सबसिडी’ देण्याची आवश्यकता नसेल, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणचा सरासरी वीजदर सध्याच्या ९ रु. ४५ पैसे यावरून ९ रुपये १४ पैशांपर्यंत वर्ष २०२९-३० पर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.