प्रयागराज – प्रचंड गर्दी आणि सुरक्षा यांच्या पार्श्वभूमीवर कुंभक्षेत्री २५ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहन पास रहित केले जातील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. वाहन पासवर हे स्पष्टपणे लिहिले असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. या कालावधीत महाकुंभक्षेत्र हे ‘नो व्हेईकल झोन’ अर्थात् ‘वाहन मुक्त परिसर’ घोषित करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनांचे मार्ग वळवले आहेत.