Padma Awards 2025 : ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित

  • केंद्र सरकारकडून पद्म पुरस्करांची घोषणा

  • मनोहर जोशी, गझल गायक पंकज उधास यांना (मरणोत्तर), साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण

पद्मभूषण पुरस्कार सन्मानित साध्वी ऋतंभरा आणि मनोहर जोशी व गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर)

नवी देहली – केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २५ जानेवारील सायंकाळी उशिरा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या १३९ जणांना पद्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ७ जणांना पद्माविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांंमध्ये २३ महिला असून १० जण परदेशी नागरिक आहेत. १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार घोषित करण्यात आले. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण, वन्यजीव अभ्यासक अन् लेखक अरण्यऋषी मारुति चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

पद्म पुरस्कार मिळालेल्या काही मान्यवरांची नावे  

पद्मविभूषण

माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहर, सुझुकी मोटरचे माजी प्रमुख ओसामू सुझुकी (मरणोत्तर), कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया, गायिका शारदा सिन्हा (मरणोत्तर) इत्यादी

पद्मभूषण

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट निर्माते शेखर कपूर, ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग, माजी हॉकीपटू पी.आर्. श्रीजेश, साध्वी ऋतंभरा, ज्येष्ठ भाजप नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर), भारतीय-अमेरिकी अभियंता तथा उद्याोजक विनोद धाम इत्यादी

पद्मश्री

मारुति चितमपल्ली, अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य, शास्त्रीय गायिका अश्‍विनी भिडे-देशपांडे, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार, पारंपरिक विणकाम अन् हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर, चित्रकार वासुदेव कामत, गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे १०० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, ब्राझिमध्ये वेद आणि गीता शिकवणारे अध्यात्मिक गुरु जोनास मासेट्टी, कुवेतमधील योग प्रशिक्षक शेखा एजे अल सबा, माजी क्रिकेटपटू आर्. अश्‍विन, पॅरालिम्पिक (विकलांग खेळाडू) तिरंदाज हरविंदर सिंग, गायिका जसपिंदर नरुला, गायक अरजीत सिंह इत्यादी