गोरेगाव येथे खडकपाडा फर्निचरच्या बाजारात भीषण आग !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचरच्या बाजारात सकाळी ११.१५ वाजता भीषण आग लागली. लाकडी वस्तूचे सामान ठेवलेल्या ५ ते ६ गाळ्यांना आग लागली असून आगीची तीव्रता वाढली आहे. २ सहस्र चौरस मीटर परिसरात ही आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या ५ टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत लाकडी सामान, प्लास्टिक, थर्माकोल, प्लायवूड, भंगार सामान आदी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.