महाकुंभात होणार ‘ड्रोन शो’ !

वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या सिद्ध करणार

प्रयागराज, २५ जानेवारी (वार्ता.) – कुंभनगरीत २६ जानेवारी या दिवशी सेक्टर ७ मध्ये ‘ड्रोन शो’ आयोजित होईल. भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि महत्त्व यांवर आधारित हा कार्यक्रम असणार.

प्रकाश आणि संगीत यांचा संयोग यामध्ये पहाण्यास मिळेल. या वेळी ड्रोनच्या साहाय्याने वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या सिद्ध करण्यात येतील.