प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – अभिनेत्री ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. किन्नर आखाड्याकडून त्यांना महामंडलेश्वरपद बहाल केले. याआधी ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. त्यांच्यात महामंडलेश्वर बनवण्यावरून जवळपास १ घंटा चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ममता कुलकर्णी यांनी साध्वीच्या वेशभूषेत कुंभक्षेत्री प्रवेश केला. भगवी वस्त्रे आणि गळ्यात तुळशीच्या माळा, असा त्यांचा पेहराव होता. किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मी नारायण म्हणाले की, यापुढे ममता कुलकर्णी या ‘ममता नंदगिरि’ म्हणून ओळखल्या जातील. ममता कुलकर्णी या २५ वर्षांनंतर भारतात परतल्या आहेत. अमली पदार्थ माफिया विक्की गोस्वामी यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.