
‘७.१.२०२५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. संदीप आळशी यांचा ‘रात्री झोपण्यापूर्वी आध्यात्मिक स्तरावरील उपाय आवर्जून करणे आवश्यक !’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखामध्ये पू. संदीपदादांनी लिहिले आहे, ‘साधकांनी रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे खडेमिठाचे (टीप) उपाय करावेत.’ (टीप : मीठ पाण्याचे उपाय म्हणजे साधारण अर्धा बालदीभर पाण्यात १ – २ मूठभर खडे मीठ टाकून नंतर त्यात पाय बुडवून १० ते १५ मिनिटे नामजप करणे आणि नंतर ते पाणी प्रसाधनगृहात विसर्जित करावे.)
त्यानंतर मी प्रतिदिन रात्री खोलीत गेल्यानंतर खडेमीठ पाण्याचे उपाय करायला आरंभ केला. एक दिवस माझे डोके अर्धशिशीमुळे पुष्कळ दुखत होते. मी ध्यानमंदिरात बसून नामजप केला, तरीही माझी डोकेदुखी न्यून होत नव्हती. मी खोलीत गेल्यावर प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली आणि मीठ पाण्याचे उपाय केले.
मीठ पाण्याचे उपाय केल्यानंतर माझे डोके दुखायचे थांबले आणि माझे डोके एकदम हलके झाले. त्यानंतर माझे मन निर्विचार झाले. काही वेळाने मला शांत झोप लागली. ही अनुभूती दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्री. प्रवीण नराल, सोलापूर सेवाकेंद्र (१०.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |